Page 3 of 8

Re: वलय (कादंबरी) Marathi latest 2020 sex story

Posted: 08 Jun 2020 21:42
by admin
वलय - प्रकरण ४


एकदा सोनी आणि सुप्रिया रूमवर नव्हते तेव्हा दुपारी एक वाजता गरमागरम "राजमा चावल" खातांना रागिणीला एक फोन आला. नंबर ओळखीचा वाटत नव्हता.

पलीकडून आवाज आला, "जानू, पहचाना मुझे?"

तो आवाज ऎकताच ती एकदम अस्वस्थ झाली. चमचा तसाच ताटात ठेवून ती डायनिंग टेबल वरून उठली आणि अस्वस्थपणे बोलत बोलत बेडरूम मध्ये गेली. जेवतांना त्या काॅलवर बोलणे तिच्यासाठी जवळपास अशक्य होते.

"क क कौन? रा राहुल गुप्ता?" घाबरत रागिणी बोलली.

"अरे वा! ठिक पहचान लिया तूने! लेकीन पहचानने में इतना समय लगा कमिनी तुझे? सहर में जाकर भूल गयी तेरे अशिक को?", तो आवाज उद्धट वाटत होता.

"सबसे बडा कमिना तो तू है नालायक! मेरा नंबर कहाँ से मिला तुझे?" रागिणीही काही कमी नव्हती.

"वो सब छोड और सुन! मुझे पचास हजार रूपिया दे दे, नही तो मै तेरा नंबर तेरे हजबंड को दे दूँगा और तेरे बारे में सबकुछ बता दूँगा!"

रागिणी आता घाबरली. फोन तिच्या मूळ शहरातून म्हणजे दिल्लीहून होता. या माणसाला आता पैसे देण्यावाचून पर्याय नव्हता. नंतर त्याला बघता येईल. आता त्याच्याशी उलझण्याइतका तिच्याकडे वेळ, मानसिकता आणि उत्साह नव्हता. मात्र या माणसाची मजल पैसे मागण्यापर्यंत जाईल असे तिला वाटले नव्हते. पण सध्या त्याला चूप करणे तिला आवश्यक होते. पोलिसांकडे जायचे की नाही तसेच सुप्रिया आणि सोनीला हे सांगायचे की नाही किंवा तिचा मुंबईतील बॉयफ्रेंड सूरजला याबाबत सांगायचे की नाही हे ती नंतर ठरवणार होती. आता आवश्यक होते या माणसाला पैसे देऊन चूप करणे!




"बता साले हरामी तेरा अकाउंट नंबर!! आधे घंटे मे भेजती हूँ पैसा, लेकीन तेरा सडा हुआ मूँह बंद रखना!" ती ओरडली.

"अब आ गयी छोरी लाईन पे!" तो जिंकल्याच्या आविर्भावात म्हणाला.

फोन ठेवल्यानंतर ती स्वत:वर चिडली. पूर्वी केलेल्या काही चूका आता तिच्यासमोर अडथळे बनून येत होत्या. तिला भूतकाळाची ती आठवण नकोशी होती पण, काही ना काही कारणाने तो भूतकाळ तिच्या वर्तमानकाळात परत परत शिरून भविष्यकाळाच्या गाडीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न करत होता आणि तिच्या भविष्यकाळातील स्वप्नांना हुलकावणी देण्याचा प्रयत्न करत होता. आता लगेच त्या गोष्टीवर विचार करून दिवस खराब करायची गरज नाही असे तिने ठरवले. टेबलावरचा राजमा चावल थंड झाला होता. तिने राजमा पुन्हा ओव्हन मध्ये गरम केला, तो पुन्हा भातावर टाकला आणि शांततेने जेवण केले. आज रात्री तिच्या नंतर हॉरर सिरीयलचे शूटिंग होते. आता दुपारी झोप घेणे आवश्यक होते. रागिणीला आपली मुंबईतील मैत्रीण आणि पूर्वीची रुम पार्टनर गौरी हिची आठवण आली, जी सध्या कॅनडात होती आणि तेथेच सेटल झाली होती. तिच्याशी थोडावेळ ती फोनवर बोलली आणि मग बेडवर गेली. तिच्याशी बोलल्यावर तिला हायसे वाटले आणि ताण हलका झाला.




मग रात्रीच्या शुटिंगसाठी तिला मिळालेली स्क्रिप्ट ती वाचत बसली. ती ज्या हॉरर सिरियलमध्ये काम करत होती त्याची थोडक्यात कथा अशी होती – "एका खेडेगावातील मैत्रिणीकडे शहरातील तीन मैत्रिणी येतात आणि त्या चौघी दोन स्कूटीवरून गावापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका जवळच्या छोट्या जंगलात सहलीसाठी जातात. तेथे जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात त्या जेवण बनवणार असतात आणि दिवसभर मजा करणार असतात. सोबत त्या ब्लूटूथ स्पीकर घेऊन आलेल्या असतात. मोबाईलमधली गाणी त्या स्पीकरवर लावली जातात. जवळच एक नदी आणि छोटीशी जुन्या काळातील पडीक गुहा असते. गम्मत म्हणून एक जणी त्या गुहेत शिरते आणि बराच वेळ झाला तरी परत येत नाही म्हणून एकेक करून तिला शोधायला गुहेत शिरतात. शेवटी चौथी एकटीच गुहेच्या बाहेर उरलेली असते. ती सुद्धा हिम्मत करून आतमध्ये जाते आणि?"

या पुढची कथा अजून रागिणीला सुद्धा माहिती नव्हती. आजकाल इन्टरनेटच्या जमान्यात कथांची चोरी होत असल्याने आणि कथाबीज किंवा कथेचा शेवट चोरीला जाण्याच्या घटना वाढत असल्याने एका ठराविक मर्यादेपर्यंतच आणि टप्प्या टप्प्याने कथा कलाकारांना माहित होत होती. हेच सिनेमा बनवतांना सुद्धा पाळले जाऊ लागले होते.

Re: वलय (कादंबरी) Marathi latest 2020 sex story

Posted: 08 Jun 2020 21:42
by admin
वलय - प्रकरण ५


थोड्या वेळानंतर रागिणीने बेडवर अंग टाकले. कपाळावर हात ठेवून ती छताकडे बघत बसली.

स्क्रिप्ट वाचता वाचता बराच वेळ निघून गेला पण आता तिला पुन्हा तो फोन कॉल आठवू लागला. झोपण्याचा प्रयत्न केला तरी झोप काही केल्या येत नव्हती. डोळ्यात गुंगी साठत होती होती पण अनेकविध विचारांनी झोप येत नव्हती...

... तिचे कान काचांच्या फुटण्याच्या आवाजाने भरून गेले.

रोहनचा भीषण अपघात तिला आठवला...

तिचे जीवनातले पहिले प्रेम - रोहन राठी!

दिल्लीतल्या मॉडर्न कॉलेजमधले त्या दोघांचे मॉडर्न प्रेम!

आणि तिला आठवला तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा तिच्या कॉलेजातला राहुल गुप्ता ज्याचा आता फोन आला होता.

रोहन आणि तिने एकत्र पाहिलेली स्वप्ने!

तिला कॉलेज जीवनापासूनच अॅक्टींगचे वेड होते...

दृष्ट लागेल असे जन्मजात सौंदर्य तिला लाभलेले होते आणि ते तिने तरुणपणी आवडीने जपले आणि टिकवले आणि वाढवले होते.

तिचे व्यक्तिमत्व सुद्धा सळसळते आणि उत्साही होते, म्हणून ते सौंदर्य आणखी खुलून दिसायचे.

तिचा चेहरा खूपच बोलका होता.

मनातील अगदी कोणतीही भावना तिच्या चेहऱ्यावर लगेच दिसून यायची. तिचा चेहेरा लगेच लालसर व्हायचा.

त्यात भर म्हणून तिला अभिनय करण्याची आवड होती. कॉलेजात अनेक नाटकांतून तिने भाग घेऊन वाहवा मिळवली होती. कॉलेज संपले की तिला मुंबईला यायचे होते. थोडक्यात तिचे अभिनय क्षेत्रातले भविष्य उज्वल होते हे नक्की!

रोहनने तिला तिच्या करियर निवडीची मोकळीक दिली होती. त्याला लंडन मध्ये MBA करून नंतर मॅनेजमेंट मध्ये करियर करायचे होते.

तिचे वडिल दिल्लीतल्या उच्चभ्रू वर्तुळात उठबस असणारे श्रीमंत बिझिनेसमॅन आणि रोहन एका प्रायव्हेट कॉलेज मधल्या प्रोफेसरचा मुलगा!

रागिणीच्या घरच्यांचा तिच्या रोहन सोबतच्या संबंधांना विरोध होता. पण, दोघेही हे ठरवून चुकले होते की रोहनने रागिणीच्या घरच्यांचे मन जिंकायचे आणि मग रागिणीने त्यांचे मन वळवायचे....

पण बरेचदा आपण ठरवतो एक आणि होते काही दुसरेच!

कारण फीलगुड सिनेमांच्या कथांमध्येच फक्त असे घडत असते की एखादा प्रियकर प्रेयसीच्या घरात काही कारणाने प्रवेश मिळवून हळूहळू आपल्या स्वभावाने सगळ्यांची मने जिंकतो.... पण रागिणीला विश्वास होता की रोहन असे नक्की करेल. खऱ्या जीवनात असे तो करून दाखवेन.. त्यांनी दोघांनी त्या दृष्टीकोनातून तयारी पण सुरु केली.

त्यासाठी त्यांनी "मेरा पिया गया परदेस!", "बहू परदेसी!", "मेरी दुल्हनिया गयी है सात समुंदर पार!" असे टिपिकल सुपरहीट पिक्चर पण पहिले आणि खऱ्या जीवनाशी तुलना करून ते दोघे हसत राहिले.. असे होईल तसे होईल अशी स्वपने रंगवत राहिले, पण कुणालातरी या त्या दोघांच्या या सर्व प्लानिंगची खबर मिळाली होती हे मात्र नक्की!

आणि मग ...

त्या रात्री छोट्या रस्त्यावरून हायवेवरील चौकात नेहमीच्या वेगात वळतांना अचानक प्रकट झाल्यासारखा तो ट्रक उजव्या बाजूने त्यांच्या कारसमोर आला...
रोहन कार चालवत होता. बरोबर कारच्या पुढे उजव्या बाजूला त्याच्या सीटला ट्रकची जोरदार धडक बसली. जोरकस धडकेने रोहन जागीच ठार झाला. त्या धडकेने कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि डाव्या बाजूचा दरवाजा उघडून रागिणी खाली पडली पण तिला थोडेसे खरचटले.

तोपर्यंत ट्रक वेगाने निघून गेला. पण जवळच पोलीस गस्त असल्याने ट्रक ड्रायव्हरला पकडण्यात यश आले.

ट्रक ड्रायव्हर रामसिंग यादवला पकडून नंतर सोडून देण्यात आले होते कारण त्याने मुद्दाम धडक दिल्याचा किंवा ट्राफीक नियम तोडल्याचा असा कुठलाच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पुरावा सीसीटिव्ही मध्ये दिसत नव्हता. तो एक अपघात असल्याचेच सिद्ध झाले, घातपात नाही. रागिणीला पुसटसा घातपाताचा संशय आला होता पण तिच्याकडे कोणताही ठाम पुरावा नव्हता...

पण तो अॅक्सिडेंट मात्र तिच्या जीवनाला वेगळ्याच वळणावर घेऊन आला. नंतर ती भयंकर निराश होऊन डिप्रेशनमध्ये गेली... त्यातच तिच्याकडून एक चूक घडली आणि मग क्रमाने अनेक गोष्टी चुकत गेल्या जसे ...

तिला पुढचे आठवणार एवढ्यात सूरजच्या फोनने तिची विचारयात्रा भंग पावली. स्वतःला सावरून आवाजामधला रडवेला अंश गिळून ती नेहमीच्या सहजतेने सूरजला म्हणाली, "हां, सूरज बोल ना. कैसा है तू? कब आया?"

नंतर बराच वेळ ती सूरजशी बोलत होती. सूरज एक महिना ब्राझिलला जाऊन परतला होता. बिझिनेसच्या निमित्ताने त्याच्या अनेक परदेश वाऱ्या नेहमी व्हायच्या. त्यापैकीच ही एक वारी संपवून तो परतला होता.

त्याचेशी बोलताना तिला थोडे हायसे वाटले. या अफाट पसरलेल्या शहरात पैसा कमावण्यासाठी यांत्रिकपणे घड्याळाच्या काट्यांनुसार धावणाऱ्या आणि जगणाऱ्या असंख्य माणसांच्या महापूरात तिला त्याचा नेहमी आधार वाटत होता...

Re: वलय (कादंबरी) Marathi latest 2020 sex story

Posted: 08 Jun 2020 21:43
by admin
वलय - प्रकरण ६


एके दिवशी "चार थापडा सासूच्या" साठी रात्री तीन वाजेपर्यंत राजेशने लॅपटॉप वर लिखाण केले. जवळपास दहा एपिसोड तीन दिवसांत लिहून झाले होते. एपिसोडिक स्टोरी आणि स्क्रिप्ट अशा दोन्ही गोष्टी त्याने पूर्ण केल्या. रात्री जास्त वेळ जागून त्याने एकदम तीन एपिसोड पूर्ण झाले.

लिखाण अगदी एडीट करून तयार होते. इमेलवर ते लिखाण पाठवून अगदी आनंदाने त्याने लॅपटाॅप बंद केला. इतक्या घाईत लिहून पूर्ण करण्यामागे त्याचा एक उद्देश होता. त्याला त्याच्या गावी जायचे होते. उद्याच निघायचे होते….

पण सकाळी सात वाजता उठल्यावर अनपेक्षितपणे सुप्रियाचा फोन आला...

"तू आज येणार आहेस स्टुडिओत?", सुप्रिया विचारू लागली.

"नाही सुप्रिया! मला जरा गावी जावं लागतंय. काम आहे!", त्याने सुप्रियाला गावी जाण्याबद्दल आधी सांगीतले नव्हते.

"राजेश, मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे!", सुप्रिया गंभीर होत म्हणाली.

"महत्वाचा विषय? कोणता?"

"आपल्या दोघांच्या आयुष्याबद्दलचा!"

"सुप्रिया, तुला नेमकं काय म्हणायचं आहे?"

"जरा स्पष्टच सांगते…"

"थांब सुप्रिया! फोनवर नको!"

"मग कुठे?"

"केपलर्स कॅफे मध्ये भेट!"

"किती वाजता?"

"दहाला ये. तिथेच नाश्ता करू!"

केपलर्स कॅफे. एका कोपऱ्यातल्या टेबलावर दोन्ही बसले. दोघांनी व्हेज ग्रिल सँडविच मागवले.

सोबत कॅपुचिनो कॉफी.

"राजेश, मी सरळ सरळ मुद्द्यालाच हात घालते. आपण लग्न करायचं का?"

"सुप्रिया, खरं सांगू? मला या प्रश्नाचं उत्तर आत्ता सांगता येणार नाही"

"का सांगता येणार नाही राजेश?", सुप्रियाला राजेशच्या अशा या पावित्र्याचे आश्चर्य वाटले.

"मला अजून बरीच मजल गाठायची आहे. माझे क्षेत्र अस्थिर आहे. बेभरवशाचं आहे. इन्कम मध्ये सातत्य नाही. मुंबई सारख्या शहरात आपल्याला परवडणार नाही!"

"हे तू बोलतो आहेस राजेश? तू? मी म्हणते की तू एकटाच कशाला घेतोस आपल्या दोघांची जबाबदारी? मी नाही का असणार आहे तुझ्या सोबतीला? माझेही तेच क्षेत्र आहे. मी समजू शकते तुझी सो कॉल्ड अस्थिरता!"

"अगं तू समजूतदार आहेस. पण माझे काय? मी कदाचित तसा तुझ्याइतका समजूतदार आहे असे मला वाटत नाही. माझी गावाकडे काही महत्वाची कामं आहेत. तसेच पत्रकारिता, स्क्रिप्ट लिखाण यासाठी मी नेहमी फिरत असणार आहे. लेखनासाठी नेहमी वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत राहणार. तुला तर माहीत आहे सगळं!"

"राजेश, मला कल्पना आहे या सगळ्यांची! पण मला ते सगळं मान्य असेल!"

"हे बघ! प्रॅक्टिकली विचार कर सुप्रिया. तू आणि मी दोघेही या बेभरवशाच्या क्षेत्रात एकत्र येऊन भरवशाचा संसार नाही करू शकत!"

"राजेश, मनापासून ठरवलं तर सगळं काही करू शकतो आपण! आपण दोघेही मेहनत करून आपला संसार यशस्वी करू!"

"मी मानतो की आपण दोघेही महत्वाकांक्षी आहोत, मेहनती आहोत. पण, पुढचा काळ कुणी पाहिलाय?", असे म्हणतांना राजेशने नजर इकडे तिकडे वळवली.

"मग काय करायचे? मी माझ्या आई बाबांच्या म्हणण्यानुसार लवकरच अॅरेंज मॅरेज करून टाकू का?", तीचा स्वर थोडा रडवेला वाटत होता पण सावरून तिने स्पष्टच विचारले. पण सोबतच राजेशच्या रोखठोक आणि स्पष्टपणाचे मनातून तिला कौतुकही वाटत होते. तोच स्पष्टपणा तिने त्याच्यावरून वापरून पहिला.

"हाच तुझा मनमोकळेणा मला भावतो रे, राजेश मला!" ती मनात म्हणाली.

"मला वाटते होय. तू मार्गी लाग. माझ्यासाठी नको थांबूस!" राजेशने तिचा चेहरा दोन्ही हातात धरला आणि सरळ सांगून टाकले.

"राजेश, परत एकदा विचार कर. आपण एक दोन वर्षे थांबूया का?", तिने त्याचे हात तिच्या चेहऱ्यापासून दूर केले.

"एक दोन वर्षे?"

"मला म्हणायचंय की एकमेकांना ओळखायला आपण आणखी वेळ देऊया का?"

"सुप्रिया, हे बघ! एकमेकांना ओळखायला दोन महिने सुद्धा पुरतात किंवा कधीकधी चार वर्षे सुद्धा पुरत नाहीत. मी तुझे आयुष्य माझ्या महत्वाकांक्षेसाठी धोक्यात घालू इच्छित नाही!" राजेश स्पष्ट म्हणाला.

"महत्वाकांक्षा सगळ्यांनाच असते राजेश! पण म्हणून कुणी त्याला संसारासाठी अडथळा मानत नाही. तू मला आवडतोस राजेश, खूप आवडतोस! तुझ्या मनात कुणी दुसरी तर नाही ना? सांगून टाक! " ती खूप भावूक झाली.

"नाही सुप्रिया. दुसरी कुणीही नाही!"

"मग असे का करतोयस राजेश तू?"

"हे बघ! तू मला आवडतेस सुप्रिया!! पण जीवनाची साथीदार कशी असावी किंवा असू नये याबद्दल माझ्या मनात तशी काहीच कल्पना, अपेक्षा आणि प्रतिमा मी निर्माण केलेली नाही सुप्रिया! तसा मी अजून विचार केलेला नाही." त्याचेही डोळे पाणावले.

"ठिक आहे. मान्य आहे! तसे असेल तर आपण एकत्र न आलेलेच बरे!", प्रॅक्टिकल विचार करून तिने स्वतःला सावरले आणि सांगून टाकले.

ती पुढे म्हणाली, "पण, हे बघ राजेश. आपण एकाच क्षेत्रात आहोत. कामानिमित्त आपली भेट होतच राहाणार. सो लेट्स बी प्रोफेशनल! आपल्या वैयक्तिक गोष्टी कामाच्या आड येऊ द्यायच्या नाहीत.
नाहीतर त्यामुळे दोघांचेही नुकसान होईल!" पण असे म्हणताना मनात एकीकडे तिला असंख्य वेदना झाल्या.

"मान्य आहे मला!" तो मनापासून म्हणाला, "आपली मैत्री कायम राहील. यापुढे सुद्धा! आपले प्रोफेशनल संबंध आहे तेच आणि तसेच राहातील!"

"ठिक आहे राजेश. चल निघते मी. उशीर होतोय!" सुप्रिया टेबलावरून उठत म्हणाली.

सुप्रियाने बिल दिले आणि तिच्या कारने निघून गेली. ती हुंदके देत होती. आपले मन आणि हृदयाचे विश्व उलटेपालटे झाल्यासारखे तिला वाटले.

राजेश सुद्धा आपल्या मार्गी चालता झाला. त्याचे डोळे सुद्धा रडून लाल झाले होते...

तो मनात म्हणत होता, "सुप्रिया, असे काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागतात. तुला काही गोष्टी माहित नाहीत. काही बंधने आहेत माझ्यावर! समजा मी ते तोडेनसुद्धा! तूही आहेसच माझ्या मनात! पण आता काळ आणि वेळ वेगळी आहे सुप्रिया! माझ्या खूप महत्वाकांक्षा आहेत. कोणत्याही थराला जाईन मी त्यासाठी! योग्य वेळ आली की तुलाच काय या क्षेत्रातील सगळ्यांना समजेलच!