Marathi Sex Stories रौशनी

Discover endless marathi sex story and novels. Browse marathi sex stories,hindi adult, Marathi katha,erotic stories. Visit theadultstories.com
User avatar
sexy
Platinum Member
Posts: 4069
Joined: 30 Jul 2015 19:39

Marathi Sex Stories रौशनी

Unread post by sexy » 26 Jun 2016 09:53

रौशनी..१
राम राम मंडळी, “तात्याभाई, रौशनीने तुमको चाय पिने को बुलाया है!” मन्सूर हे मला सांगायला आला. मी तेव्हा मुंबईच्या फोरासरोडवरील ‘झमझम’ या देशी दारूच्या बारमध्ये हिशेब लिहिण्याचं काम करत असे. फोरास रोड! मुंबईच्या रेडलाईट विभागातला एक प्रमुख विभाग. तेव्हा मुंबईमध्ये फोरास रोड, फॉकलंड रोड, कामाठीपुरा येथे मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय चालायचा. आजही चालतो. रस्त्याच्या दुतर्फा अनेक छोट्यामोठ्या चाळवजा इमारती. या सर्व इमारतींमधून खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू असे. १५ वर्षांपासून ते अगदी पस्तिशी चाळीशी पर्यंतच्या पोरीबाळी व बायका संध्याकाळ झाली की चेहेर्‍यावर रंगरंगोटी करून परकरब्लाऊजच्या वेषात रस्त्याच्या कडेला, इमारतींच्या दाराखिडक्यात उभ्या रहायच्या. अनोळखी तसेच ओळखीपाळखीच्या लोकांना खाणाखुणा, शुकशुक करून बोलवायच्या. अगदी २०-२५ रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत वय, रंगरुपाप्रमाणे पैसे घेऊन आलेल्या गिर्‍हाईकाची भूक भागवायच्या. एका रात्रीत पाच पाच, सहा सहा गिर्‍हाईकं! खरंच, फार भयानक विश्व होतं ते मंडळी. अत्यंत ओंगळवाणं आणि किळस आणणारं होतं! पण आपली रोजीरोटीच मुळी त्या सरकारमान्य देशीदारूच्या बारमध्ये हिशेब लिहायची होती. त्यामुळे त्या भागात रोज जावं लागत असे! ‘बशीर मोराशी’ असं काहीसं नांव असणार्‍या माणसाच्या मालकीचे तीन चार बार होते. त्या सर्व बारस् चं अकाउंटस् सेटप करण्याचं काम बशीरभाईनी मला दिलं होतं. मी तेव्हा मुंबईच्या प्रभादेवी भागात असलेल्या जी एम् ब्रेवरीज लिमिटेड या देशीदारूचं उत्पादन करणार्‍या कंपनीतं नोकरी करत होतो. मंडळी, आपल्याला आश्चर्य वाटेल, मुंबईतील सातशेहून अधिक बारमध्ये आमचा माल जायचा. अक्षरशः तुफान खप. मरण नसलेला धंदा! बर्‍याचश्या बार मालकांची आणि माझी चांगलीच ओळख. काही वेळेला त्यांची मागणी जास्त असायची, अन् माल कमी असायचा. मग जास्त मालाकरता कंपनीच्या सेल्स् मॅनेजरकडे वशिला लावण्यासाठी ‘तात्यासेठ’, ‘तात्याभाई’ अश्या उपाध्याही मला मिळायच्या! बर्‍याच बार मालकांचे बरेच अनुभव तिथे मी घेतले. बहुतेक सगळे शेट्टी! तुळू भाषा बोलणारे. त्यांचे दोन नंबरचे व्यवसायही बघितले, पण त्याविषयी पुन्हा केव्हातरी! झमझम बार! फोरासरोडवरच्या गजबजलेल्या वस्तीत सरकारमान्य देशी दारू मिळणारा बार. तसा हा बार दिवसभरच गिर्‍हाईकांनी गजबजलेला असायचा, पण संध्याकाळी अगदी माणसंनी फुल्ल असायचा. शंभर रुपयांपर्यंत आख्खी बाटली मिळायची. तिथे येणारी बहुतेक सगळी मंडळी ही गुंड अन् मवाली. दिवसभर काहीतरी उलटेपालटे धंदे करायचे, लहानमोठ्या चोर्‍या करायच्या आणि संध्याकाळ झाली की झमझम बारमध्ये हजर! त्यातले काही इकडेतिकडे फुटकळ नोकर्‍या करणारे चतूर्थश्रेणी कामगारही असत. झमझम बारमध्ये यायचं, फुल्लटाईट व्हायचं अन् घरी जाऊन बायकाला मारझोड करायची एवढीच काय ती यांची मर्दुमकी! काही जण मर्दुमकी गाजवायला बाजुलाच असलेल्या इमारतीतल्या वेश्यांकडे जात. २०-२५ रुपयात मर्दुमकी गाजवून होई! शिवाय मारामार्‍या, चाकूवस्तर्‍याचे वार, दादा, भाई, पोलिस, त्यांचे हप्ते, या सगळ्या गोष्टी तर त्या बारमधल्या नित्याच्याच. याच सर्वांमध्ये सुशिक्षित, सुसंस्कृत, पांढरपेशा समाजातला एक तात्या अभ्यंकरही ‘अपनेको क्या? अपने कामसे मतलब!’ या भावनेने त्या बारमध्ये हिशेब लिहीत बसलेला असायचा! मन्सूर हा आमच्या बारमधला एक हरकाम्या पोर्‍या. दहापंधरा रुपयांच्या रोजीवर पडेल ती कामं करायचा. राहायचाही तिथेच. शिवाय दिवसाकाठी कुणाकुणाकडून पाचदहा रुपयांची टीपही मिळायची. बारमध्ये अजून तीनचार जण कामाला होते. त्या सगळ्यांकरता दोन टाईम डाळभाताचं जेवण त्या बारमध्येच शिजायचं. डाळभात, लिंबाची फोड अन् पापड! वरतून तुपाबिपाची धार नाही हो. ते सगळे लाड आपल्या दुनियेत! मन्सूरसोबत मीही कधी मूड आला अन् रात्री घरी परतायला उशीर होणार असेल तर तिथेच डाळभात जेवायचा. मजा यायची! आमच्या बारच्या बाजूलाच एक एकमजली चाळ होती. त्या संपूर्ण चाळीत वेश्याव्यवसाय चालायचा. दिवसभरातल्या फावल्या वेळात मन्सूर तिथल्या वेश्यांचीही काही फुटकळ कामं दोनपाच रुपयांच्या टीपेवर करायचा. त्या काळात माधुरी आणि संजूबाबाचा ‘साजन’ हा चित्रपट नुकताचा प्रदर्शित झाला होता. मन्सूरने माझ्याकडून तिकिटाकरता उधार पैशे घेऊन तो चित्रपट पाहिला होता. “तात्याभाय, माधुरी बाकी क्या मस्त दिखती है. अपनेको उसे एक बार मिलनेकाईच है! आपुन उसको बोलेगा के तू भोत चिकनी दिखती है” मला हसू आवरेना. माधुरीचे जे असंख्य चाहते होते त्यात एक आमचा मन्सूरही होता, हे त्या बिचार्‍या माधुरीला माहीत नसावं! हा लेख लिहिताना आत्ता सहजच हा किस्सा आठवला. असो..! “तात्याभाई, तुमको रौशनीने चाय पिनेकू बुलाया है!” मन्सूर. “कौन रौशनी?” “वो बाजुके बिल्डिंगमे नही रहती क्या? वोईच! एक-दो बार उसने तुमको यहा आतेजाते हुए देखा है. तुमारे बारेमे मेरेसे भोत पुछती है. तुम साला अच्छा शर्टपॅन्ट पेहेनता है ना! चिकना दिखता है, शरीफ दिखता है! बाजुके बिल्डिंगमे जो लडकीलोग है ना, ये रौशनी उन लडकीलोगकी मौसी है. तुमको उसने एक बार मिलनेको बुलाया है!”

User avatar
sexy
Platinum Member
Posts: 4069
Joined: 30 Jul 2015 19:39

Re: Marathi Sex Stories रौशनी

Unread post by sexy » 26 Jun 2016 09:54

Marathi Sex Stories रौशनी..२

‘कोण कुठली रौशनी! मी का जावं तिच्याकडे?’ असा विचार करून मी मन्सूरकडे दुर्लक्ष केलं. पण त्यानंतर दोनतीनदा मन्सूरने रौशनी बोलवत असल्याचं पुन्हा सांगितलं. शेवटी ‘च्यामारी बघू तरी एकदा ही भानगड तरी काय आहे?’ असा विचार करून एके दिवशी मी त्या रौशनीला भेटायला जायचा विचार पक्का केला. …रात्रीचे १० वाजले असावेत. मी मन्सूरला सोबत घेऊन बारच्या बाजुलाच असणार्‍या चाळीमध्ये रौशनीला भेटायला निघालो. त्या चाळीत जाण्याची माझी पहिलीच वेळ! दोन्ही बाजूला परकरपोलकी घातलेल्या, चेहेर्‍यावर रंगरंगोटी केलेल्या वेश्या उभ्या होत्या. त्यातल्या बर्‍याचश्या रंगरुपाने दिसायला केवळ भयानक होत्या. गलीच्छ होत्या. काळ्याकुट्ट देहावर, चेहेर्‍यावर मेकपची पुटं चढवलेल्या! रंगीबेरंगी भडक कपडे घातलेल्या! चेहेर्‍यावर आचकट विचकट भाव अन् हसू! कोण कुठल्या या मुली? इथे कश्या आल्या असतील? कुणी आणल्या असतील? किती रुपायाला विकल्या गेल्या असतील? छे! सगळेच नुसते प्रश्न…! उत्तर एकाचंही माहीत नाही! मला त्या मुलींची किळसही आली आणि एकिकडे दयाही आली! पाच पंचवीस पन्नास रुपयांकरता फालतूतल्या फालतू, अत्यंत थर्डरेट माणसांसमोर पाय फाकवायचे? आणि त्यानंतर होणार्‍या फक्त यंत्रासारख्या हालचाली! कॉटवर आडवं पडून पाय फाकवणारं फक्त एक यंत्र! आणि यांच्याकडे येणारी गिर्‍हाइकं? ती एवढी भुकेली असतील?? काहीही करून कसंही करून स्त्रीशरीर मिळाल्याशी कारण! आपण नेहमी म्हणतो, ‘की काय रे माणूस आहेस की जनावर?’ हे म्हणण्यामागे माणसाकडून जनावरापेक्षा निश्चित काहीतरी वेगळ्या अपेक्षा असतात. अहो पण कुत्र्यामांजरांच्या संभोगातदेखील एक वेळ शृंगार सापडेल, प्रेम सापडेल! पण इथे मी खरोखरंच माणसातली जनावरं बघत होतो. कारण माझ्या आजुबाजूला गिर्‍हाइकांचीदेखील वर्दळ, येजा सुरू होती. माणूसरुपी जनावराचा आणि एका माणूसरुपी पाय फाकवणार्‍या यंत्राशी पाच पंचवीस रुपायांच्या बोलीत ठरलेला व्यावहारिक संभोग! तो म्हणणार, ‘चल लेट जा. बहुत नखरा कर रहेली है’, आणि ती म्हणणार, ‘चल, जल्दी कर. आज धंदा कम है साला, जादा टाईम मत ले. धंदे का खोटी मत कर!’ मंडळी, हे सगळंच खूप कठीण होतं. भयानक होतं! पण मला त्या मुलींची, त्या माहोलची, त्या गिर्‍हाइकांची किळस का येत होती? मी यांच्यापेक्षा वेगळ्या सोसायटीतला, वेगळ्या समाजातला होतो म्हणून?? माझ्या समाजात किंवा माझ्यापेक्षा उच्चभ्रू समाजात नवरा सहा सहा महिने बोटीवर असतो, तुफान पैसा कमावतो. आणि इथे त्याची धर्म(!)पत्नी स्वतःच्या पॉकेटमनीकरता, वरखर्चाकरता पाच, दहा, पंधरा, पंचवीस हजारांची रक्कम घेऊन (तिच्या सुंदरतेनुसार, कमनीयतेनुसार!) अज्ञात ठिकाणी हेच काम करते की! अश्याही आहेतच की काही स्त्रीया! पण त्यांचा कुठे बाजार नसतो! बरीचशी कामं एसएमएस द्वारा चुपचाप होतात! बर्‍याचवेळा मध्यस्थांमार्फत ही कामं होतात, किंवा पेजथ्री मधल्या पार्ट्यांमधून एकमेकांशी ओळख तरी असावी लागते, मैत्री व्हावी लागते! मग कदाचित पैशांचाही प्रश्न येत नाही. सगळंच उच्चभ्रू आणि हायफाय लेव्हलवर चालतं!! पण तरीही त्यापैकी एखादी बाई समोर आली की नकळत माझ्या तोंडून कदाचित, ‘हॅलो मॅडम, हाऊ आर यू?’ हेच शब्द बाहेर पडणार! मंडळी, तेव्हा मात्र मला त्या बाईची किळस नाही येणार! कारण ती छान दिसते, पॉश राहते! ‘तिचा नवरा सहा सहा महिने बोटीवर असतो ना, अहो मग काय करणार? शेवटी माणूस आहे आणि माणसालाही काही भुका असतात, गरजा असतात!’ असा सोयिस्कर विचार मी करणार! ‘च्यामारी आपल्यालाही या बाईबरोबर चान्स मिळाला तर काय मजा येईल!’ हाही विचार माझ्या मनात येऊ शकतो. पण तेव्हादेखील मी माणूसच असतो बरं का! जनावर नसतो! मंडळी, माझा एक करोडपती पंजाबी क्लाएंट आहे. बिझिनेस एथिक्स म्हणून मी त्याचं नांव नक्कीच घेऊ शकत नाही. साला भगवान आहे तो आपला! मंडळी, हा माणूस मुळचा चंढीगढचा. पण कामधंद्याकरता नेहमी फिरतीवर असतो. तुफान पैसा कमावतो. त्याचे शेअर्सचे सगळे व्यवहार मी पाहतो. तो एकदा दोन तीन महिन्यांच्या परदेशवारीकरता गेला होता. आल्यावर त्याने मला फोन केला. त्याला त्याच्या शेसर्ससंबंधी मला नित्याची माहिती द्यायची होती, माझ्या फीचे पैसेही त्याच्याकडून घ्यायचे होते. ‘अरे तात्यासेठ, कैसा है? एक काम करना तात्या, मै आज शामतकही बंबईमे हू, बाद मे मुझे दिल्ली जाना है. तुम अंधेरीमे फलाना हॉटेलमे मुझे ये ये टाईमपे मिलना. फुरसतमे बात करेंगे. बियर पियेंगे!’ असा आमचा फोन झाला. आपल्याला काय हो, धंदेसे मतलब! मी ठरल्यावेळी अंधेरीला असलेल्या त्या पॉश होटेलात त्याला भेटायला गेलो. स्वागतकक्षात चौकशी करून तो उतरलेल्या खोलीपाशी गेलो, दारावर टकटक केली. माझ्या पंजाबी क्लाएंटने आतून दार उघडलं. ‘आओ तात्या, बैठो. स्टेटमेन्ट लाये हो?’ मंडळी, मी आत जाऊन क्षणभर उडालोच! आतल्या डबलबेडवर मराठी वाहिन्यांतून, चित्रपटांतून काम करणारी एक प्रसिद्ध प्रतिथयश नटी बसलेली होती! तीदेखील माझ्याकडे पाहून फिल्मी पद्धतीने हसली.
त्या पंजाबी माणसाने आमची एकमेकांशी ओळख करून दिल्यावर आम्ही एकमेकांना ‘हाय हॅलो’ केलं! ‘बैठ तात्या. बियर पियेगा?’ या प्रश्नाने मी भानावर आलो. पाच दहा मिनिटातच हिशोबाची स्टेटमेन्टस मी त्याच्या हवाली केली, माझे पैसे घेतले अन् तेथून निघालो. तो मला सोडायला खोलीच्या बाहेर आला. मला राहवेना. मी त्याला म्हटलं, ‘साब, ये मॅडम तो बहोत फेमस है. आप उन्हे कबसे जानते है?’ अरे जानपेहेचान किस बात की? एक बार टीव्हीपे चॅनल सर्फींग करते हुए मैने देखा इसको. सिरियल लाईनके एक आदमीसे पता किया. साला पैसा फेकनेका! बस! तुझे चाहिये क्या बोल?!!’ असं म्हणून तो गडगडाटी हसला आणि खोलीत परत गेला. मी माझे पैसे नीट जपून खिशात ठेवले आहेत याची खात्री करत तेथून रवाना झालो! ती मालिकानटी मला पॉश वाटली. मी तिच्याशी लाळगळूपणा करत हाय हॅलोही केलं. कारण ती सुरेख होती, पॉश होती, स्वच्छ होती!! पण रोशनीच्या चाळीत उभ्या असलेल्या बायका मात्र मला गलिच्छ वाटत होत्या!! साला दुनियेचा न्यायच अजब आहे! असो, थोडं विषयांतर होतंय, पण ते आवश्यक आहे. रौशनीचे हे व्यक्तिचित्र लेखन म्हणजे तात्याचा एक जीवनानुभव आहे. हे लेखन म्हणजे तात्याची एक भडास आहे. ओकू दे मला मनमोकळेपणाने! तर कुठे होतो आपण? मी निघालो होतो रौशनीला भेटायला. तिच्या वस्तीत, तिच्या चाळीत, रात्री दहाच्या सुमारास! मंडळी, खरं सांगायचं तर माझी क्षणभर जरा फाटलीच होती. ‘कुठे चाललोय आपण? आणि का चाललोय? काय काम असेल आपल्याकडे या रौशनीचं?, च्यामारी यातून कुठल्या नवीन भानगडीत तर आपण अडकणार नाही ना?’ अशा नाना शंकाकुशंका क्षणभर मनात येऊन गेल्या. पण साला आपला पण स्वभाव, ‘जो होगा, वो देखा जाएगा भेंडी..!!’, या टाईपचा असल्यामुळे मी त्या शंकाकुशंकांना माझ्या मनात फार वेळ थारा दिला नाही! मन्सूर अर्थातच माझ्यासोबत होता. आम्ही रौशनीच्या खोलीपर्यंत जात असतांना मन्सूर मात्र मोठ्या सराईतपणे आणि सफाईने त्या आजूबाजूच्या वेश्यांना, ‘ए हटो सब एक साईड मे. तात्यासाब आ रहे है. साला गोवमेन्ट का आदमी है. लफडा नही मंगता है. नही तो बंद करेगा सबको!’ अशा धमक्या देत मला घेऊन रौशनीच्या खोलीकडे निघाला होता! मी ‘गव्हर्नमेन्ट का आदमी’ केव्हा झालो हे माझं मलाही माहिती नाही! शेवटी एकदाचे आलो आम्ही रौशनीच्या खोलीपाशी. खोलीत समोरच सोफ्यावर रौशनी बसली होती! पन्नाशीच्या आसपासची, गोरी, आणि देखणी!!

User avatar
sexy
Platinum Member
Posts: 4069
Joined: 30 Jul 2015 19:39

Re: Marathi Sex Stories रौशनी

Unread post by sexy » 26 Jun 2016 09:54

Marathi Sex Stories रौशनी..3

“आओ तात्याभाई, बैठो. शर्माना मत!” रौशनी माझ्याकडे पाहात हसून म्हणाली. माझं नांवबिव सगळं बहुधा या बयेला माहीत होतं. मी तिच्या खोलीत शिरलो. आत जाताचक्षणी माझ्या कल्पनेला पहिला धक्का बसला. ‘वेश्याबाजाराच्या एका मावशीचं घर ते कसं असणार? जसा तो बाजार गलिच्छ, त्यात वेश्याव्यवसाय करणार्‍या मुली जश्या गलिच्छ आणि कळकट, तशीच त्यांची मावशी व तिचं घरही कळकट, कुबट आणि ओ येणारं असणार!’ या माझ्या कल्पनेला पार तडा गेला. एक तडा रौशनीच्या घरात शिरण्यापूर्वी तिच्या रुपाकडे पाहून गेलाच होता! दुसरा तडा तिच्या घरात शिरल्यावर गेला! अतिशय स्वच्छ, नीटनेटकं, छान आवरलेलं घर. घरात मंद उदबत्त्यांचा वास सुटलेला. तिच्या घरात जाऊन तेथील सोफ्यावर मी बसलो. समोर पाहतो तर भिंतीवर विवेकानंदांचा फोटो, एका लहानश्या शोकेसवजा कपाटात काही पुस्तकं ठेवलेली, कोपर्‍यात उभा केलेला तानपुरा! वेश्याव्यवसाय चालणार्‍या मुंबईच्या एका गलिच्छ वस्तीत मी बसलो होतो या गोष्टीचा माझा माझ्यावरही विश्वास बसेना! बाजूच्याच सोफ्यावर रौशनी बसलेली होती. तिचं सौंदर्य नक्कीच खानदानी वाटत होतं, गोरपान रंग आणि पन्नाशीच्या पुढची असूनही आकर्षक बांधा राखून होती! साधारणपणे वेश्यावस्तीतल्या मावश्याही तशाच कळकट, कजाग, ओबडधोबड, भयानक शिवराळ, बथ्थड चेहेर्‍याच्या, अक्षरशः कैदाशिणी वाटाव्यात अश्या, अत्यंत स्थूल शरीरमानाच्या, अस्ताव्यस्त आणि शेप गेलेल्या ओथंबलेल्या स्तनांच्या, नेसलेल्या साड्यांमधून दिसणारी त्यांची ती सुटलेली काळी पोटं दाखवणार्‍या असतात असा माझा समज होता! पण रौशनी एकदम वेगळी होती. चेहेरा सुरेख होता पण करारी होता, त्यात एक जरब वाटत होती! ती असणारच म्हणा. वेश्या वस्तीतील ३०/३५ मुलींची मावशी होणे, त्यांना सांभाळणे, पोलिस, गुंड, दारुवाले यांच्याशी नेहमी संबंध असणार्‍या बायका या! यांना साधं, गरीब राहून चालणारच नव्हतं! ते काहीही असो, मला मात्र रौशनीकडे पाहताच क्षणी तिचे आकर्षण वाटले होते. ‘च्यामारी, बाई पन्नाशीच्या घरातली दिसते पण अजूनही चांगला दमखम राखून असावी असा एक विचार माझ्या मनात डोकावून गेला! कोण असेल ही? इथे कुठून आली असेल? च्यायला रंडीबाजारातली मावशी ही, हिच्या घरात स्वामींचा फोटो कसा काय? काय संबंध? स्वामी हिने वाचले आहेत काय? हिच्या घरात इतरही पुस्तकं दिसताहेत? किती शिकलेली असेल ही? आणि कोपर्‍यातला तो तानपुरा? ही गाणं शिकलेली आहे की काय? की इतर कुणी यांच्या घरात गातं? मला हिने का बोलावलं असेल? आत्ता आपण ज्या कॉमन गॅल्लरीतून हिच्या घरात प्रवेश केला तिथून आमचा झमझम बार दिसतो खरा, परंतु तिथे येजा करताना असं किती वेळा हिने मला पाहिलं असेल? मलाच हिला का बोलवावासं वाटलं असेल? मन्सूरने माझ्याबद्दल हिला काय सांगितलं असेल? सगळे प्रश्न! फक्त प्रश्न!! च्यामारी सुशिक्षित/सुसंस्कृत मंडळींना प्रश्नच फार पडतात! “काय घेणार शेठ? काही दूध, लस्सी, कॉफी मागवू का? की थोडी व्हिस्की घेणार? सगळा बंदोबस्त आहे आपल्याकडे!” रौशनी कधी मराठीत बोले, तर कधी बंबैय्या हिंदीत तर कधी अस्खलित हिंदीत. साला मी कसला तिच्याकडे काही दूध-लस्सी वगैरे घेणार होतो? मला खरं तर वेश्याव्यवसाय सांभाळणार्‍या एका मावशीच्या घरात आपण बसलो आहोत हेच अजून पचवायला कठीण जात होतं. त्यातच अधनंमधनं बाहेरून त्या परकर पोलक्यातल्या, काळपट रंगाच्या, ओठ सुजलेल्या विशीपंचविशीतिशी तल्या वेश्या माझ्याकडे पिजर्‍यातला प्राणी पाहावा अश्या पद्धतीने पाहात होत्या, एकमेकांकडे पाहून टिंगलीच्या सुरात हासत होत्या! ‘ये कौन चुतिया इधर आ गया’ असंच त्या आपापसात म्हणत असणार! ‘च्यामारी झक मारली आणि इथे आलो. का आलो? इथून उठून ताडकन चक्क निघून जावं की काय?’ असेच विचार माझ्या मनात येत होते! संस्कार! दुसरं काय? सुशिक्षित, सुसंस्कृत घराण्यातले पांढरपेशा संस्कार! रामरक्षा, पर्वचा, पाढे, शाळा, शिक्षक, मोतोपंत, बालकवी, या सगळ्या गोष्टी मला रौशनीच्या घरच्या सोफ्यावर आरामशीरपणे बसू देत नव्हत्या. कुल्याला फोड आलेला नसतानही मी त्या सोफ्यावर अवघडलेपणाने बसलो होतो! तेवढ्यात, “एऽऽऽ क्यो खडी है सब लोग इधर? क्या नाटक है? ये सेठ इधर सो ने को नही आया है! चलो, निचे जाव सब लोग मादरचोद! धंदा करना नही करना क्या आज? यहा किसिको फोकट का खाना नही मिलेगा. धंदा नही करना है तो भागो यहासे और अपना रास्ता सुधारो! मन्सूर, तू अब जा और निचे जाके रुक. सेठको भेजती है मै थोडी देर के बाद!” अरे बापरे माझ्या! बहुतेक माझं अवघडलेपण रौशनीच्या ध्यानात आलं असावं आणि तिने तिच्या ठेवणीतल्या आवाजात त्या बाहेर घुटमळणार्‍या रांडांना दम भरला असणार! ‘ये सेठ इधर सोने के लिये नही आया?? बाबारे माझ्या.. सानेगुरुजींची ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अरपावे’ ही कविता म्हणणारा मी. एका सरळमार्गी शिक्षिकेचा मुलगा होतो मी. नोकरीधंद्याच्या निमित्ताने त्या भागात वावरत असे. हा इथे आपल्याबरोबर झोपायला आला आहे असं त्या मुलींना वाटलंच तरी कसं? अर्थात, वाटलं असेल तरी त्यांची काय चूक म्हणा! तिथे जाणारी माणसं केवळ त्या एकाच कामाकरता तिथे जात! ते काही स्वरुपानंदांच्या पावसचं किंवा गुहागरच्या व्याडेश्वराचं मंदिर नव्हतं! “थोडी लस्सी तरी घ्या शेठ आमच्याकडची! हमभी आपही की तरह इन्सान है, थोडी लस्सी लोगे तो हमारीभी इज्जत रहेगी!” रौशनीचा आवाज पुन्हा एकदन नॉर्मल. एका क्षणापूर्वी ही बया केवढ्या मोठ्यांने ओरडली होती! एवढं या बाईला स्वीच ऑन, स्वीच ऑफ तंत्र अवगत होतं? “अरे कृष्णा, जा धोबीसेठ को एक लस्सी उपर भेजनोको बोल!” आतल्या खोलीतून एक काळासावळा, १७-१८ वर्षांचा मुलगा बाहेर आला. चौकडीचा शर्ट आणि हाफ चड्डी घातलेला. तो पटकन माझ्यासमोरून जात लस्सीची ऑर्डर द्यायला खाली निघून गेला. “बसा तात्याशेठ. लस्सी मागवली आहे. हा कृष्णा. इसिके बारेमे आपसे जरा बात करनी है!” आता मात्र रौशनीचं बोलणं मला थोडं आश्वासक वाटू लागलं आणि हळूहळू माझा धीर चेपू लागला. मंडळी, आपल्याला खोटं वाटेल पण त्या बाईच्या चेहेर्‍यावर एक विलक्षण आत्मविश्वास होता, वागण्याबोलण्यात अदब होती! समोरच्या माणूस कितपत पाण्यात आहे हे अवघ्या एका नजरेत ओळखण्याचं कसबही तिच्यात अनुभवाने आलेलं असावं. माझ्या नजरलेला नजर देऊन बोलत होती. उलट मीच थोडासा भांबावलो होतो, उगाच इकडेतिकडे पाहिल्यासारखं करत होतो. तिच्या नजरेला नजर देणं मला जमत नव्हतं. वास्तविक मला guilty वाटण्याचं काहीच कारण नव्हतं. ना मी तिचे चारचव्वल देणं लागत होतो, ना कुठल्या गुन्ह्यात मला तिच्यासमोर उभं केलं गेलं होतं, ना मी तिच्यासोबत लाळघोटेपणाकरून झोपायला निघालो होतो! पण च्यामारी बाईचा चेहेराच साला भारी होता, आव्हानात्मक होता, एक प्रकारची हुकुमत होती तिच्या चेहेर्‍यावर!

Post Reply